चार अरब देशांनी कतारशी संबंध तोडल

0
94

>> दहशतवादाला पाठिंब्याचा आरोप

बहारिन, सौदी अरेबिया, इजिप्त व युएई या देशांनी कतार हा देश दहशतवादाला तसेच दहशतवादी इस्लामी गटांना पाठिंबा देत असल्याच्या कारणावरून त्या देशाबरोबरील सर्व प्रकारचे संबंध तोडले असल्याचे जाहीर केले. मात्र या अरब देशांचा वरील निर्णय हा असमर्थनीय असल्याचा दावा कतारने केला आहे.
कतारच्या विदेश व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात वरील निर्णय खोट्या व तथ्यहीन दाव्यांच्या आधारावर घेतला असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय म्हणजे कतारवर हुकमत गाजवण्याचा एक प्रयत्न आहे. कतारच्या सार्वभौमत्वाचे ते उल्लंघन असल्याचेही त्यात नमूद केले आहे.
वरील चारही देशांनी आपण आपल्या देशांचे कतारमधील सर्व राजनैतिक दुतावास मागे घेणार असल्याचेही जाहीर केले आहे. तसेच या देशांनी कतारमधील आपल्या हवाई व सागरी वाहतूक सेवाही बंद केल्या आहेत. कतारशी बहारीनने सर्वप्रथम संबंध तोडले आहेत. कतार सर्व स्तरावरून दहशतवादाला पाठबळ देत असल्याचा आरोप बहारीनने केला आहे. कतारची राजधानी दोहा येथील आपला दुतावास ४८ तासात मागे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बहारीन सरकारने आपल्या नागरिकांवर कतारला जाण्यावर व तेथे राहण्यावर बंदी घातली आहे. तसेच बहारिनमधील कतारच्या नागरिकांना देश सोडण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.