चांगल्या शहरांत पणजी जगात ९०वे !

0
84

देशात जगण्यासाठी सर्वांत चांगल्या शहरांच्या यादीत पणजी शहराला ९० वा क्रमांक प्राप्त झाला आहे. या सर्वेक्षणात पुणे शहराने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
चांगल्या शहराची यादी तयार करण्यासाठी देशातील १११ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने जगण्यासाठी अव्वल शहराची यादी तयार करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी जाहीर केला आहे.