चंद्रशेखर ओक नवे माहिती महासंचालक

0
123

महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नवे महासंचालक म्हणून चंद्रशेखर ओक यांनी काल पदभार स्वीकारला. चंद्रशेखर ओक सध्या विशेष विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयात सहसचिव म्हणून दीर्घकाळ काम पाहिले आहे. मुंबईच्या जिल्हाधिकारी पदासह अनेक महत्वाच्या जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून त्यांनी काल अजय अंबेकर यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.