ङ्गादर आग्नेल पारोडा, शापोरा यूथ क्लब, वेरे युनायटेड, ङ्ग्रेंड्‌स इलेव्हन, बॅनी इलेव्हनचे विजय

0
110

वास्को (क्री. प्र.)
गोवा ङ्गुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या उत्तर व दक्षिण तृतीय विभाग लीग ङ्गुटबॉल स्पर्धेत ङ्गादर आग्नेल स्पोर्ट्‌स क्लब, शापोरा क्लब, बॅनी इलेव्हन, ङ्ग्रेंड्‌स इलेव्हन व वेरे युनायटेडने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत प्रत्येकी ३ गुणांची कमाई केली. चांदर मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात ङ्गादर आग्नेल क्लब पारोडाने चांदर क्लबवर १-० गोलने मात केली. वेल्विन लिमाने विजयी गोल नोंदवला. शापोरा मैदानावरील सामन्यात शापोरा यूथ क्लबने पेडे बूम क्लबवर ३-० असा विजय मिळविला. अस्नोडा मैदानावरील सामन्यात बॅनी इलेव्हनने ङ्गुटबॉल क्लब साखळीला ५-१ असे पराभूत केले. विजयी बॅनी इलेव्हनच्या साहील बुगडेने ३ गोल करीत हॅट्‌ट्रिक साधली. तर चंदन गोवकेर व ज्ञानेश्‍वर पेडणेकरने प्रत्येकी १ गोल केला. किटला मैदानावरील सामन्यात ङ्ग्रेंड्‌स इलेव्हनने बस्तोडा स्पोर्ट्‌स क्लबवर १-० अशी निसटती मात केली. तर हणजुणा जिमखानावर झालेल्या सामन्यात वेरे युनायटेडने नेरुल स्पोर्ट्‌स क्लबचा ८-१ असा धुव्वा उडविला.