घुमटाचा नाद गुजरातला घुमणार!

0
110

आगशी (न. वा.)
प.पू. श्री शिवकृपानंद स्वामी महाराज यांच्या कच्छ गुजरात येथील पावन पवित्र आश्रमात खास नवरात्री उत्सवानिमित्त शिरोडा येथील श्री महामाया आरती मंडळ यांना घुमट आरती कार्यक्रमासाठी शनिवार दि. १३ ऑक्टोबर रोजी निमंत्रित करण्यात आले आहे.
शिरोडा, फोंडा येथील श्री महामाया आरती मंडळाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार या मंडळाला राष्ट्रीय स्तरावर गोव्याची पारंपरिक घुमट आरती सादर करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. प. पू. शिवकृपानंद स्वामींच्या आशीर्वाद या मंडळाच्या पाठीशी निश्चितच राहणार आहेत. कलाकारांची खाण मानल्या जाणार्‍या आपल्या गोमंतक भूमीत घुमट वाद्य पूर्वीपासूनच प्रचंड लोकप्रिय ठरले आहे.
श्री महामाया या मंडळाला राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची चालून आलेली ही सुवर्णसंधी आहे. या संधीचे आम्ही सोने करू, असा आत्मविश्वास आहे. यानिमित्ताने गुजरात येथील स्वामींच्या आश्रमात गोमंतकीय घुमट आरतीची धूम दि. १३ ऑक्टोबर रोजी नियोजित कार्यक्रमानुसार चालू राहणार आहे.