घरे पाडल्याप्रकरणी कर्नाटक मंत्र्यांची बायणा येथे भेट

0
144
काल बायणा येथे आलेले कर्नाटकचे पर्यटनमंत्री आर. व्ही. देशपांडे (छाया : प्रदीप नाईक)

काटे बायणा येथे समुद्र किनार्‍यानजीकची धोकादायक घरे पाडल्याप्रकरणी कर्नाटकचे पर्यटन मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कन्नड लोकांशी चर्चा केली. गेली चार दशके हे लोक त्या वस्तीत राहत होते, त्यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे होती, असे असताना त्यांची घरे पाडणे चुकीचे आहे, असे देशपांडे म्हणाले. दरम्यान, आपण गोव्यात अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. या प्रश्‍नी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. मुरगावचे उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर यांची भेट घेऊन त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे आमदार आयवन डिसोझा, मुत्तूराज स्वामी व गोव्यातील सिद्धणा मेठी उपस्थित होते.