घरे कायदेशीर करण्याबाबत अध्यादेशास मान्यता

0
78

खासगी जमिनीतील बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्यास आणखी एका महिन्याची वाढ देण्यासाठीचा अध्यादेश काढण्यासाठी गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली.
बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्यासाठी आणखी महिनाभराची मुदत देण्यात यावी अशी मागणी संबंधित लोकांनी तसेच काही आमदारांनीही केली होती, असे खंवटे म्हणाले. यापूर्वीही हे अर्ज करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली. २८ फेब्रुवारी २०१४ पर्यंत बांधण्यात आलेल्या बेकायदा घरांच्या मालकाना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.