घरगुती वैद्य

0
2291

– सौ. मोहिनी सप्रे

तणाव कमी करण्यासाठी- पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे डोके करून झोपावे. प्राणायाम, ध्यानधारणा व योगासने करावीत. पाय काशाच्या वाटीला तेल लावून घासावे. नाकात गायीचे तूप घालावे. केळी खावीत.


 
शरीरामध्ये सकाळी वात जास्त असतो. दुपारी पित्त वाढते व संध्याकाळी कफ वाढतो. या तीनही गोष्टींचा जास्त त्रास होऊ नये म्हणून आपल्या तोंडातील लाळ जास्तीत जास्त प्रमाणात पोटात जाणे गरजेचे आहे.
१) वात – वात वाढलेला असेल तर घाण्यावरील शुद्ध तेलाचा वापर करावा. म्हणजे नॉन-रिफाईंड तेल.
कारण रिफाईंड तेलामुळे जास्त रोग होतात. वात वाढू नये म्हणून शुद्ध तेलंच वापरावे. शुद्ध तेल चिकट असते व त्याला जो वास असतो तो वात वाढू देत नाही. त्या तेलात प्रथिने असतात. तेलाला जेवढा वास व चिकटपणा असेल तेवढे ते चांगले समजावे. एकच तेल कधीही वापरू नये. तेल अधुनमधून बदलावे.
शेंगदाणा, सूर्यफुल, तीळ तेल यांपैकी आलटून पालटून वापरावे. सोयाबीन तेल पचायला जड असते. म्हणून ते जास्त वापरू नये. थंडीमध्ये तिळतेलाचा वापर करावा. तसेच शेंगदाणे-गूळ-तूप यांचा वापर करावा. तीळाचे लाडू-चिक्की खावी. पांढर्‍या तिळांपेक्षा काळे तीळ वापरावेत. उन्हाळ्यात पचायला हलके अन्न खावे.
२) पित्त – पित्त वाढू नये म्हणून गावठी गायीच्या तूपाचा वापर करावा. दिवसातून २ ते ४ चमचे तूप खावे.
३) कफ – कफ शांत राहण्यासाठी गूळ व मध खावा. शरीरातील फॉस्फरसाचे प्रमाण कमी झाले तर कफ वाढतो. गुळामध्ये फॉस्फरस जास्त असतो. तसेच काकवी पण खाल्लेली चांगली. गूळ घेताना गडद रंगाचा घ्यावा. पांढरा किंवा पिवळा घेऊ नये. काळपट-चॉकलेटी गूळ घ्यावा. साखरेचा वापर कमीत कमी करावा व त्याऐवजी गुळाचा वापर करावा. त्यामुळे आपले आयुष्य निरोगी राहण्यास मदत होते. गूळ सगळ्याला पचवतो याउलट साखर पचायला जड असते. गूळ शक्तिवर्धक आहे. म्हणून पूर्वी बाहेरून कुणी आले तर गुळ-पाणी द्यायची पद्धत होती. तसेच उन्हात बाहेर पडतानापण गूळ खाऊन पाणी प्यावे व मग बाहेर पडावे, उन्हाचा त्रास होत नाही व अंगात तरतरी येते.
वजन कमी करायचे असेल तर गूळ, तीळ, शेंगदाणे यांचा आहारात वापर करावा. साखरेने वजन वाढते.
* वायू व पित्ताचा त्रास कमी व्हावा म्हणून ताकामध्ये ओवा घालून प्यावे. तसेच भाज्यांमध्येपण ओव्याचा वापर करावा. जेवणानंतर ओवा+सैधव मीठाबरोबर खावा. तसेच काळे जिरे व हिंग आहारात वापरावे. धने-कोथिंबीर यांचाही वापर करावा. या गोष्टींचा रोज वापर केल्याने पित्त कमी होते.
कफासाठी गुळ, मध, सुंठ, आले यांचा वापर करावा. तसेच गावठी गडद हिरवे विड्याचे पान खावे. पानात सुंठ, आलं, गुलकंद, गूळ घालून खावे. कफ कमी होतो. तसेच बडीशेप व लवंगसुद्धा वापरावी.
* वात कमी होण्यासाठी – शुद्ध तेल, दही, दूध, ताक व फळांचे रस घ्यावे. तसेच अधूनमधून त्रिफळा चूर्ण घ्यावे. आणखी एक वातशामक औषधी म्हणजे मेथी! रोज सकाळी ७-८ मेथीदाणे पाण्यासोबत खावेत. तसेच मेथीची भाजी खावी.
* कॅल्शियमसाठी – चुना पानाला लावून खाणे. तसेच दूध, दही, पनीर, ताक, लोणी, संत्र, मोसंबी, आवळा, आंबा, केळी यात कॅल्शियम असते. केळात जास्त कॅल्शियम असते व ते सहज पचते. म्हणून रोज एकतरी केळ खाल्लं पाहिजे.
चाळीशीनंतर स्त्रियांनी केळ व चुना लावून पान खावे. ज्यांना स्टोनचा त्रास आहे त्यांनी चुना खाऊ नये. आपल्या घरातच इतक्या औषधी वस्तू आहेत की त्यांचा आपण जास्तीत जास्त वापर स्वयंपाकात केला पाहिजे. देवाच्या पूजेसाठी आपण जे पंचामृत वापरतो ते वात-पित्त व कफावर उपयुक्त आहे. दूध-तूप-दही-मध-साखर यांचे पंचामृत बनवून रोज खावे. यामुळे तीनही दोष कमी होतात. तसेच अंगात ताकद येते.
काही रोगांवरील घरगुती उपचार पाहू…
* गॅसमुळे छातीत दुखणे – एक चिमटीभर कापूर विड्याच्या पानातून खाणे. एक चमचा आल्याच्या रसात २ चमचे तूप घालून चाटणे.
* नस शुद्धी – शरीरातील रक्तवाहिन्या मोकळ्या असतील तर बीपी नॉर्मल राहते. नसा मोकळ्या होण्यासाठी रोज धने-जिरे भरड पूड खावी. पूड नुसती खायला जमत नसेल तर भातातून, ताकातून घ्यावी. नसा मोकळ्या झाल्यामुळे हृदयविकाराचा संभव राहात नाही. तसेच मूत्रखडे पण विरघळतात. दृष्टीदोष कमी होतो. वजन कमी होते. उत्साह वाढतो. यासाठी धने-जिरं पूड रोज खावी.
* उच्च रक्तदाब – जेव्हा रक्तातील पित्त वाढते तेव्हा रक्तदाब वाढतो. तो कमी होण्यासाठी ज्याच्यात क्षार आहेत अशा वस्तू खाव्यात. उदा. मेथी, मेथीची भाजी, गाजर, दुधी, सफरचंद, पेरू, पालक, वांगे, हिरव्या पालेभाज्या इत्यादी. ज्यांचा रक्तदाब जास्त आहे त्यांनी मीठाचे प्रमाण कमी करावे.
तसेच ज्यांचा रक्तदाब कमी असतो त्यांनी सैंधव मीठाचा वापर करावा. तसेच दालचिनी पावडर अर्धा चमचा + मध अर्धा चमचा असे पाण्याबरोबर घ्यावे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मधाऐवजी गुळाचा वापर करावा.
दुधीचा रस एक ग्लास घ्यावा. मग एका तासाने नाश्ता करावा. मेथी पाण्यात भिजवून ते पाणी रिकाम्या पोटी प्यावे. दुधीच्या रसात कोथिंबीर, पदिना, तुळस हाताने तोडून घालावे. व प्यावे.
हाय ब्लडप्रेशरसाठी बेलाची पाने अतिशय लाभदायी आहेत. ४-५ पाने वाटून एक ग्लास पाण्यात घालून उकळणे व पाणी अर्धे झाले की गाळून प्यावे. गोमुत्र रिकाम्या पोटी प्यावे.
* किडणी खराब झाल्यास – पाव कप पिंपळाच्या पानांचा रस व पाव कप कडुनिंबाच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ घ्यावा.
* झोपेच्या तक्रारी – दोन्ही नाकपुड्यात गाईचे तूप कोमट करून १-१ थेंब घालावे. झोप लागून घोरणे पण कमी होईल. थेंब नाकात घातल्यावर हलका श्‍वास घ्यावा. म्हणजे तूप आत जाईल. कपभर दुधात जायफळ व खडीसाखर घालून रात्री प्यावे. डोक्याला तेल लावावे.
* मानसिक ताण – तणाव कमी करण्यासाठी- पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे डोके करून झोपावे. प्राणायाम, ध्यानधारणा व योगासने करावीत. पाय काशाच्या वाटीला तेल लावून घासावे. नाकात गायीचे तूप घालावे. केळी खावीत.
* कानदुखी – कानात कोरफडीचा ताजा रस जरा कोमट करून घालावा.
ऐकू येत नसेल तर मुळाच्या रसाचे ४ तेंब कानात घालावेत.
* दातदुखी – लवंग तेल कापसावर घेऊन तो बोळा दाढेत धरावा. कापूर कापसावर घेऊन दाढेत धरावा व लाळ थुंकावी.
हिरड्यातून रक्त येत असेल तर त्रिफळा चूर्णाने दात घासावेत. बकुळीची साल उगाळून तो लेप बाहेरून लावावा.