ग्रेटर पीडीएविरोधात आज शक्तिप्रदर्शन

0
117

‘गोयकार अगेन्स्ट पीडीए’ने ग्रेटर पीडीएच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ३.३० वाजता आझाद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केले आहे. दरम्यान, शहरात जमावबंदीचा आदेश लागू असल्याने पीडीए विरोधकांना मोर्चा काढता येणार नाही.

सांताक्रुझ आणि सांत आंद्रे मतदारसंघांतील पीडीए विरोधकांनी गोंयकर अगेन्स्ट पीडीएची स्थापना केली आहे. या दोन्ही मतदारसंघांतील सर्व गावे ग्रेटर पणजी पीडीएतून वगळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांचा पीडीएला वाढता विरोध लक्षात घेऊन नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी वरील दोन्ही मतदारसंघांतील सर्व गावे पीडीएतून वगळण्याची अनौपचारिक घोषणा गेल्या शनिवारी केली होती. तथापि, ग्रामस्थांनी सरकारवर दबाव कायम ठेवण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रेटर पणजी पीडीएमधून दोन्ही मतदारसंघांतील गावे वगळण्यात येतील. पीडीएमध्ये केवळ ताळगाव आणि कदंब पठाराचा समावेश केला जाईल. कदंब पठारावरील ग्रामस्थांचा पीडीएला विरोध असल्यास सदर भागसुद्धा वगळण्याची तयारी आहे, अशी घोषणा नगरनियोजन मंत्री सरदेसाई यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.