गो गोवा नाऊ’ पोर्टलचे अनावरण

0
132

>> नवहिंद समुहाचा उपक्रम

दैनिक नवप्रभाचे इंग्रजी भावंड असलेल्या ‘धी नवहिंद टाईम्स’ ह्या गोव्यातील आघाडीच्या व सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राने सेसेरपेु.लेा हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे.

इंडिएन चेस ग्रॅण्डमास्टर व माजी जागतिक बुध्दीबळपटू व सध्याचे जागतिक वेगवान बुध्दीबळपटू विश्‍वनाथ आनंद यांच्या शुभहस्ते हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ह्या पोर्टलमुळे पर्यटक तसेच गोव्यातील जनता यांना गोव्याविषयीची इत्यंभूत माहिती उपलब्ध होऊ शकणार असल्याचे आनंद यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. कनिष्ट गटातील बुध्दीबळ जेतेपद मला गोव्यात मिळाले होते. त्यामुळे गोव्यात माझ्या संस्मरणीय अशा आठवणी आहेत, असेही आनंद यानी नमूद केले आहे.
ह्या पोर्टलवर कला, खाद्य संस्कृती, पर्यटन स्थळे, क्रीडा, रंगभूमी, संगीत, फॅशन, शॉपिंग, लाईफ स्टाईल व नाईटलाईफ याविषयीची माहिती जनतेला उपलब्ध होणार आहे.