गोव्याच्या मंत्र्यांना लवकरच आणखी खाती

0
99

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अतिरिक्त खाती देण्याचे काम पुढील आठवड्यात होणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. काल पणजीत ऑनलाईन सार्वजनिक ग्राहक निवारण पोर्टलचे अनावरण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
मंत्रिमंडळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह १२ मंत्री आहेत. त्यापैकी विश्‍वजीत राणे व माविन गुदिन्हो यांच्याकडे प्रत्येकी एकच खाते आहे. राणे यांच्याकडे आरोग्य तर गुदिन्हो यांच्याकडे पंचायत खाते आहे. तर अन्य सर्व मंत्र्यांकडे दोन-दोन खाती आहेत. राणे व माविन गुदिन्हो यांच्याकडे प्रत्येकी एकच खाते असल्याने त्यांना दोघानाही आणखी प्रत्येकी एक महत्वाचे खाते देण्यात येणार आहे.