गोव्याच्या डेसी, कॅरनची निवड

0
125

>> अंडर १७ मुलींचे फुटबॉल प्रशिक्षण शिबिर

ज्युनियर मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या समाप्तीनंतर निवड समितीच्या बैठकीत ३४ प्रमुख खेळाडूंची व १३ राखिव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारताच्या सीनियर महिला संघाच्या प्रशिक्षक मायमोल रॉकी, साहाय्यक प्रशिक्षक चौबा देवी व आलेक्स अँब्रोज यांनी खेळाडूंची निवड केली. या संघात डेसी क्रास्टो, कॅरन इस्रोसियो यांच्या रुपात दोन गोमंतकीय आहेत.

भारतात पुढील वर्षी होणार्‍या मुलींच्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेसाठी या खेळाडूंना गोव्यात सुरू होणार्‍या प्राथमिक प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचा आदेश महासंघाने दिला आहे. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आलेक्स अँब्रोज यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू आपले कौशल्य दाखवणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये मणिपूर व हिमाचलचे प्रत्येकी सात तर झारखंडच्या सहा खेळाडूंचा समावेश आहे.

निवडण्यात आलेले खेळाडू
गोलरक्षक ः तनू, थोडाम देवी, अँद्रिया सारखेल, मनीषा, मंजू गांजू, बचावपटू ः पूर्णिमा कुमारी, फांगजोबाम देवी, सुधा तिर्की, अंतरिका, क्रितिना देवी, नीशा, डेसी क्रास्टो, नाकेता कामना, वैष्णवी चंद्रकांत, मध्यरक्षक ः मार्टिना, अवेका सिंग, प्रियंका देवी, अस्ताम ओरेन, अंजू, पूनम, सलोमी मिंझ, दृष्टी पंत, मनीषा, प्रियंका सुजीश
आघाडीपटू ः किरण, अमिशा बक्सला, मरियम्मल, सुमती कुमारी, मनीषा नाईक, लिंडा कोम, शिलकी देवी, साई सांके, लालनुम सियामी व कॅरन इस्रोसियो.
राखिव खेळाडू ः गोलरक्षक ः अंजली बारके, अंशिका, बचावपटू ः गिया सुंदरम, लिंघनेयलाम किपजेन, सरस्वती क्री, शिल्पाबेन ठाकूर, रितू, फुलमणी ओरान, मध्यरक्षक ः इशिता मॅथ्यू, ग्लेडीस झोनुनसांगी, आघाडीपटू ः सानिका पाटील, मालविका पी., संतोषी कुमारी.