गोव्याच्या झेवियरला जलतरणमध्ये सुवर्ण व रौप्य

0
81

>> खेलो इंडिया अंडर-१७ राष्ट्रीय शालेय स्पर्धा

नवी दिल्ली येथे कालपासून सुरू झालेल्या पहिल्या खेलो इंडिया अंडर-१७ राष्ट्रीय शालेय स्पर्धेत काल पहिल्याचा दिवशी गोव्याने १ सुवर्ण व २ रौप्य मिळवून ३ पदकांची कमाई केली. गोव्याने ही तिन्ही पदके जलतरणमध्ये प्राप्त केली.
गोव्याच्या झेवियर मायकल डिसोझाने १ सुवर्ण व १ रौप्य पदक मिळविले. त्याने मुलांच्या १०० मीटर्स बटरफ्लाय प्रकारात ०ः५७ः८५ अशी वेळ देत सुवर्ण कामगिरी केली. तर नंतर मुलांच्या १०० मीटर्स बॅकस्ट्रोक प्रकारात १ः००ः०३ अशी वेळ देत रौप्य पदक मिळविले. तर झिदान इक्बालने मुलांच्या ४०० मीटर्स फ्री स्टाईल प्रकारात ४ः१८ः१३ अशी वेळ देत रौप्य पदक प्राप्त केले.