गोव्याच्या अंडर २३ क्रिकेट संघाचा अचित कर्णधार

0
149

गुंटूर आंध्र प्रदेश कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेसाठी गोवा क्रिकेट संघटनने काल गोव्याच्या २३ वर्षांखालील संघाची घोषणा केली. संघाचे नेतृतव अचित शिगवानकडे सोपविण्यात आले असून उपकर्णधार म्हणून अष्टपैलू खेळाडू दीपराज गावकरची निवड झाली आहे.
गोवा आपला पहिला सामने जम्मू काश्मीरविरुद्ध ८ ते ११ ऑक्टोबरपर्यंत खेळणार आहे.

घोषित संघ पुढील प्रमाणे ः रजत शेट, प्रथमेश गावस, वैभव गोवेकर, अचित शिगवान (कर्णधार), दीपराज गावकर (उपकर्णधार), कश्यप बखले, विश्वंभर कहलोन, शिवम म्हापसेकर, इन्फांसिओ कुर्रेया (यष्टिरक्षक), लक्षय गर्ग, विजेश प्रभुदेसाई, सचिन बुक्कम, वेदान्त नाईक, धीरज यादव, अभिषेक कोठंबीकर, नाहुश जाधव.