गोव्याचा मेघालयावर विजय

0
105

>> ‘अ’ गटात द्वितीय स्थान; उपांत्य फेरीतील स्थान निश्‍चित

गोव्याने मेघालयाचा २-१ अशा गोलफरकाने पराभव करीत लुधियाना येथे सुरू असलेल्या हीरो संतोष चषक २०१८-१९ राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत काल शानदार विजयासह ‘अ’ गटात द्वितीय स्थान मिळविले.
चैतन कोमरपंत आणि व्हिक्टोरिनो फर्नांडिस यांनी गोव्याचे गोला नोंदविले. आता उपांत्य फेरीत गोव्याची लढत ‘ब’ गटात अव्वल राहणार्‍या संघाशी होणार आहे.

विजयानंतर संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना प्रशिक्षक समीर नाईक यांनी समाधान व्यक्त केले. आम्ही काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती व नवीन खेळाडूंनी चांगला खेळ केला. सामन्याच्या निकालाने हे दिसून येते. आम्ही उर्वरित सामन्यांमध्ये कोणाशील लढत द्यायला तयार आहोत, असे समीर यांनी सांगितले.
प्रशिक्षक समीर यांनी ज्योकिम अब्रांचिस, पीटर कार्वाल्हो, क्लेमेंत जोसेफ, सेरेनिओ फर्नांडिस, गोलरक्षक टायसन कायादो आणि स्ट्रायकर लालवंपुईया यांना विश्रांती दिली होती.

गोव्याने पेनल्टीवर पहिला गोल घेतला. एका गोलाच्या पिछाडीनंतर गोव्याने दमदार पुनरागमन करताना बरोबरी साधण्यात यश मिळविले. व्हिक्टोरिनो फर्नांडिसकडून मिळालेल्या अचूक पासवर चैतन कोमरपंतने संघाला १-१ अशी बरोबरी साधून देणारा हा गोल नोंदविला. त्यानंतर जेसन वाझच्या अचूक पासवर स्ट्रायकर व्हिक्टोरिनो फर्नांडिसने गोल नोंेदवित गोव्याच्या २-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केला.