गोव्याचा ब्रेंडन भारतीय संघात

0
111

थायलंडमधील बुरिराम येथे ५ जूनपासून खेळविल्या जाणार्‍या किंग्स कप स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी २३ सदस्यीय संघ काल जाहीर केला. शिबिरात शिल्लक २५ खेळाडूंपैकी त्यांनी आघाडीपटू जॉबी जस्टिन व बचावपटू निशू कुमार यांना डच्चू दिला. निवडण्यात आलेल्या सहा नव्या खेळाडूंमध्ये राहुल भेके, गोव्याचा ब्रेंडन फर्नांडिस, रेयनियर फर्नांडिस, मायकल सुसाईराज, अब्दुल सहल व भारताच्या १७ वर्षांखालील संघाचा कर्णधार अमरजीत सिंग यांचा समावेश आहे. २०१२ सालानंतर आदिल खान याचे संघात पुनरागमन झाले असून आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेला गोलरक्षक कमलजीत सिंगदेखील संघात आहे. किंग्स कपमध्ये ८ जून रोजी भारत आपला पहिला सामना खेळणार आहे.

भारतीय संघ ः गोलरक्षक ः गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, कमलजीत सिंग, बचावपटू ः प्रीतम कोटल, राहुल भेके, संदेश झिंगन, आदिल खान, सुभाशिष बोस, मध्यरक्षक ः उदांता सिंग, जाकिचंद सिंग, ब्रेंडन फर्नांडिस, अनिरुद्ध थापा, रेयनियर फर्नांडिस, प्रणॉय हल्दर, विनीत राय, साहल अब्दुल, अमरजीत सिंग, लालियानझुआला छांगटे, मायकल सुसाईराज, आघाडीपटू ः बलवंत सिंग, सुनील छेत्री, फारुख चौधरी व मनवीर सिंग.