गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन

0
148

विन्सन ग्राङ्गिक्सतर्ङ्गे आयोजित करण्यात येत असलेला गोवा मराठी चित्रपट महोत्सव यंदा १० व्या वर्षात पदार्पण करीत असून आज संध्याकाळी ६.३० वाजता गोवा कला अकादमी संकुलात होणार्‍या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल, अशी माहिती विन्सन ग्राङ्गिक्सचे संजय शेटये व ज्ञानेश मोघे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चित्रपट सृष्टीतील दिग्गज उपस्थित असतील. हा महोत्सव दि. १८ पर्यंत चालणार आहे.
यावेळी झीटीव्हीवरील ‘चला हवा येऊ द्या’ ङ्गेम भाऊ कदम, कुशल बुद्रिके आणि श्रेया बुगडे यांचा धमाकेदार कार्यक्रम होणार आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दिव्या दत्ता उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवतील. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ८ वाजता ‘कुलकर्णी चौकातील देशपांडे’ या चित्रपटाचा प्रिमियर शो होईल, अशी माहिती त्यांनी दिली. १० व्या गोवा मराठी महोत्सवातील चित्रपट पणजी येथील कला अकादमी, मॅॅकेनिझ पॅलेस आणि आयनॉक्समध्ये दाखविले जातील. यंदाच्या महोत्सवासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तसेच तीन चित्रपटांचे प्रिमियर शो महोत्सव प्रतिनिधींना पाहायला मिळणार आहेत. कुलकर्णी चौकातील देशपांडे हा उद्घाटनाचा चित्रपट असून त्याचा प्रिमियर शो १६ जून रोजी दाखवला जाणार आहे. त्याशिवाय संचार आणि टेक केअर गुडनाइट या चित्रपटांचे प्रिमियर शो महोत्सवादरम्यान पाहायला मिळणार आहेत.
या चित्रपट महोत्सवाला दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. यामध्ये सई ताम्हणकर, गजेंद्र अहिरे, सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी, नागेश भोसले, सोनाली कुलकर्णी, परेश मोकाशी, राजेश शिंगणापुरे, अंकुश चौधरी, सचिन खेडेकर, भाऊ कदम, कुशल बुद्रिके, तनिष्ठा चटर्जी, अनंत महादेवन, सुबोध भावे आदींचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा मानाचा कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. महोत्सवाची तिकिटे विन्सन ग्राङ्गिक्सच्या वास्को आणि पणजी येथील कार्यालयांबरोबरच पणजी येथील कला अकादमी, म्हापसा येथील नाटेकर ङ्गार्मसी, मडगाव येथील माया बुक स्टॉल आणि ङ्गोंडा येथील रंगरचना येथे उपलब्ध आहेत. त्याशिवाय बुक माय शो डॉट कॉम या संकेतस्थळावरूनही महोत्सवासाठी प्रतिनिधी म्हणून नोंदणी करता येईल.