गोवा डेअरीच्या अध्यक्षपदी राजेश फळदेसाई बिनविरोध

0
106

गोवा डेअरीचे नवीन अध्यक्ष म्हणून राजेश फळदेसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल करण्यात आला होता.
माजी अध्यक्ष माधव सहकारी यांच्याविरुद्ध अविश्वास संमत झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. मंगळवारी सकाळी निवड प्रक्रियेवेळी सहकार खात्याचे अधिकारी सोनू गावणेकर, गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत, माजी अध्यक्ष माधव सहकारी, नरेश मळीक, राजेंद्र सावळ, असॅल्मो फुर्तादो, बाबू कोमरपंत, धनंजय देसाई, बाबुराव देसाई, विठोबा देसाई, अजय देसाई व गुरुदास परब हे सर्व संचालक उपस्थित होते.
गोवा डेअरीचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजेश फळदेसाई यांनी शेतकर्‍यांच्या समस्या सोडवून गोवा डेअरीला शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊनच योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले.