गोवा एफसी-मुंबई सिटी एफसी लढत आज

0
86

दिल्ली डायनामोजवर आकर्षक विजयानंतर उत्साहित आणि आत्मविश्वासाने भारावलेला गोवा एफसी संघ आपल्या तिसर्‍या आपलला विजयी संवेग जारी राखण्याच्या इराद्यानेच मुंबई सिटी एफसी संघाविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. एफसी गोवाने गेल्या सामन्यात दिल्ली डायनामोज संघावर ४-१ अशी मात केली होती आणि त्यामुळे हा विजय गोव्याच्या खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावण्यासाठी निश्‍चित उपयुक्त ठरेल. मुंबई एफसीने केरळ ब्लास्टर्सविरुद्धचा आपला सामना गोलशून्य खेळला होता. गेल्या सामन्यात गोव्याच्या विजयात मोलाचा वाटा उचलताना फ्रांसिसी बचावपटू योनिस बेंगेलोनने दोन गोल नोंदविले होते. तर त्याचाच देशबंधू असलेला गोव्याचा मार्की खेळाडू मध्यपटू रॉबर्टो पिरीसने पेनल्टीवर स्पर्धेतील आपला पहिला गोल नोंदविला होता. तसेच ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर टॉल्गे ऑझ्बेनेही स्पर्धेतील आपल्या दुसर्‍या गोलाची नोंद केली होती. त्यामुळे ब्राझिलियन लेजंड झिकोच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघ बजबूत आत्मविश्वानिशी मैदानावर उतरणार आहे.
यापूर्वी या दोन संघात झालेला पहिला सामना गोलशून्य बरोबरीत संपला होता. आता डीव्हाय पाटील स्टेडियमवर मुंबईच्या समर्थकांसमोर दोन्ही संघ आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे हा सामना रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत स्पर्धेत २ विजय आणि २ बरोबरीमुळे गोव्याचे सध्या ८ गुण झालेले असून उपांत्य फेरीर्‍या शर्यतीय कायम राहाण्यासाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. विजयांच्या तुलनेत मुंबईची स्थिती गोव्यापेक्षा चांगली आहे. त्यांनी ३ सामने जिंकले आहेत. मात्र गोव्यापेक्षा गोलसरासरीत ते एका गोलने मागे आहेत. मुंबईकडे फ्रांसिसी स्ट्रायकर निकोलस अनेल्कासारखा खेळाडू असून भारतीय आघाडीवीर सुभाष सिंगही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे.