गोयच्या सायबाचे फेस्त यंदा ४ डिसेंबर रोजी

0
138

ओल्ड गोवा येथील प्रसिद्ध ‘गोंयच्या सायबाचे फेस्त’ यंदा ४ डिसेंबर रोजी साजरे करण्यात येणार आहे. दरवर्षी हे फेस्त ३ डिसेंबरला साजरे होते. मात्र, यंदा ३ डिसेंबर रविवार असल्याने फेस्त दुसर्‍या दिवशी ४ डिसेंबरला साजरे करण्यात येणार असल्याचे फा. आल्फ्रेड वाझ यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. रविवारचा दिवस लॉर्ड जेजुच्या सेवेसाठी समर्पित असतो. त्यामुळे रविवारच्या दिवशी फेस्त साजरे करण्यात येत नसल्याचे फा. वाझ यांनी सांगितले.