गोमांस व्यापार्‍यांचा दुसर्‍या दिवशीही बंद

0
217

सरकारी यंत्रणेकडून कर्नाटकातून आणण्यात येणारे गोमांस जप्त केले जात असल्याने राज्यातील गोमांस व्यापार्‍यांनी सलग दुसर्‍या दिवशी बंद पाळला. गोवा गोमांस व्यापारी संघटनेने हा विषय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे नेला आहे. दरम्यान, गोमांस व्यापार्‍यांकडून कायद्याचे पालन होत नसल्याने गोमांस जप्त केले जात आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. मारवासडा, उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पात गुरांची कत्तल करण्यासाठी गोमांस व्यापार्‍यांकडून आवश्यक कागदपत्रे सादर केली जात नसल्याने मागील दोन महिन्यांपासून गुरांची कत्तल बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात मागील काही दिवसांपासून बेकायदा गोमांस मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. या प्रकारामुळे कर्नाटकातून गोमांस गोव्यात पाठविणार्‍यांकडून सध्या गोमांस पाठविणे बंद करण्यात आले आहे, अशी माहिती गोमांस व्यापार्‍यांनी दिली. राज्यातील गोमांस व्यवसाय शनिवारपासून ठप्प झाल्याने गोमांस टंचाई निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे.