गोदावरी नदीत बोट उलटून १२ बुडाले

0
104

आंध्र प्रदेश येथे गोदावरी नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता. त्यामुळे ही दुर्घटना घडली. त्या बोटीत एकूण ६० जण होते.

बोट बुडाल्याची माहिती मिळताच एनडीआरएङ्ग पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, २३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच अनेकजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. कच्चुलुरू येथे ही बोट बुडाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळातर्ङ्गे या बोटीचे परिचालन सुरू होते. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केली.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.