गॉफकडून व्हीनसला बाहेरचा रस्ता

0
96

>> ३९ वर्षीय दिग्गजाला पंधरा वर्षीय प्रतिस्पर्ध्याचा धक्का

कोरी गॉफ या १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीने विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत धक्कादायक निकालाची नोंद करताना व्हीनस विल्यम्सला पहिल्याच फेरीत ६-४, ६-४ असे हरवून स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविला. तब्बल दोन दशकांपासून ऑल इंग्लंड परिवाराची सदस्य असलेल्या ३९ वर्षीय व्हीनसच्या नावावर महिला एकेरीतील पाच विजेेतेपदे असून व्हीनसच्या नावावर पहिली दोन दोन जेतेपदे झाली त्यावेळी तर गॉफ हिचा जन्मदेखील झाला नव्हता. विंबल्डनच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू बनल्यानंतर गॉफने व्हीनस व आपल्या वयात असलेल्या २४ वर्षांच्या अंतराची व क्रमवारीतील २६९ स्थानांच्या फरकाची तमा न बाळगता धमाकेदार खेळाचे दर्शन घडविले.

पुरुष एकेरीतही सनसनाटी निकालाची नोंद झाली. पाचवे मानांकन लाभलेल्या ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिम याला बिगरमानांकित सॅम क्वेरी याने ६-७, ७-६, ६-३, ६-० असे पराजित केले. ग्रासकोर्टचा बादशाह व द्वितीय मानांकित रॉजर फेडरर याला मात्र पहिल्या फेरीचा अडथळ पार करण्यासाठी चार सेट खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या लॉईड हॅरिसविरुद्धचा पहिला सेट ३-६ असा गमावल्यानंतर फेडररने पुढील तिन्ही सेट ६-१, ६-२, ६-२ असे सहज जिंकले.

महत्त्वाचे निकाल
पहिली फेरी
पुरुष एकेरी ः राफेल नदाल (३) वि. वि. युईची सुगिता ६-३, ६-१, ६-३, केई निशिकोरी (८) वि. वि. थियागो मोंतेरो ६-४, ७-६, ६-४, आलेक्स दी मिन्यूर (२५) वि. वि. मार्को चेकिनाटो ६-०, ६-४, ७-६, जाईल्स सायमन (२०) वि. वि. साल्वातोर कारुसो ७-६, ६-३, ६-२, मिटियो बार्टिनी (१७) वि. वि. अलियाझ बेडेन ३-६, ६-३, ६-२, ७-६.

महिला एकेरी ः स्लोन स्टीफन्स (९) वि. वि. टिमिया बासिन्स्की ६-२, ६-४, लेसिया सुरेंको (३२) पराभूत वि. ३-६, २-६, ऍश्‍ले बार्टी (१) वि. वि. सायसाय झेंग ६-४, ६-२, अँजेलिक कर्बर (५) वि. वि. तातयाना मारिया ६-४, ६-३, सेरेना विल्यम्स (११) वि. वि. गिलिया गेट्टो मोंटेकोन ६-२, ७-५, मारिया शारापोवा पराभूत वि. पॉलिन पारमेंटियर ६-४, ६-७, ०-५