‘गेरा’च्या माध्यमातून गोव्यातील मुलांना फुटबॉलच्या मार्गदर्शनाची संधी ः भुतिया

0
232

गेरा डेवलपमेंटचा गेरा रिव्हर ऑफ जॉय हा गोव्यातील पहिला चाईल्ड सेंट्रींक होम प्रकल्प कदंब पठार – पणजी येथे साकारत आहे. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला गेराचे व्यवस्थापकीय संचालक रोहीत गेरा, गेरा होमचे दूत प्रसिध्द फुटबॉलपटू बायचुंग भुतिया, प्रसिध्द टेनिसपटू महेश भूपती, डान्स गुरू शामक दावर यांची उपस्थिती होती. देशात फुटबॉल खेळाबाबत जागृती करणे आणि प्राथमिक पातळीवर प्रशिक्षणाचे महत्व समजावून सांगण्यासाठी देशभर फिरतो. बीबीएफएसच्या माध्यमातून एका चांगले व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.

गेरा कंपनीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून गोव्यातील मुलांना फुटबॉल खेळाचे मार्गदर्शन करण्याची संधी प्राप्त होणार आहे, असे फुटबॉलपटू भुतिया यांनी यावेळी सांगितले. चाईल्ड सेन्ट्रीक होम प्रकल्पाच्या विविध वैशिष्ट्यांसह क्रीडा, मानसिक विकास, कला, संगीत, अभिनय, पुननिर्मिती आदी क्षेत्रामध्ये भारतातील प्रतिथयश व्यक्तींच्या सहकार्यातून मुलांना बौध्दीक, शारिरीक व व्यावसायिक प्रशिक्षण देणार. त्या माध्यमातून सर्वोत्तम व दर्जेदार संधी उपलब्ध करून देणे पालकांना शक्य होणार आहे, असे रोहीत गेरा यांनी सांगितले. आजच्या काळात युवा गोमंतकीय घर खरेदीदारांना सक्षम करणारे व मुलांच्या सर्वांगीण विकासाला साधनसुविधा उपलब्ध करणारी पहिली संकल्पना आहे. पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या गरजा ध्यानात घेऊन परिपूर्ण घर विकसित करण्यात येत आहे. चाईल्ड सेंट्रिक होम संकल्पनेला गोव्यातून भरघोस प्रतिसाद लाभत आहे. या प्रकल्पातील ३४६ पैकी १९० घरांंची विक्री यापूर्वीच झाली आहे, असे गेरा यांनी सांगितले.

कंपनीने बदलत्या काळानुसार मुलांच्या सुप्त गुणांना बालपणापासून चालना देणार्‍या पुरक अशा प्रकल्पाला सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात खेळ, शिक्षण, कला आदी गुणांना चालना देणार्‍या साधन सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. मुलांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष देण्यात आला आहे. प्रकल्पात मुलांच्या गुणांना चालना देणार्‍या विविध अकाडमी कार्यान्वित केल्या जाणार आहेत. प्रकल्पात खास क्रीडा विभाग विकसीत केला जाणार आहे. यात ६ ते १० वर्षे, १० ते १६ वर्षे आणि १६ वर्षावरील अशा विविध वयोगटातील मुलांना खेळण्यासाठी साधन सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. पालक सुध्दा खेळात सहभागी होऊ शकतात. प्रकल्पातील अकादमीमध्ये प्रसिध्द खेळाडू महेश भूपती, बायचुंग भुतिया, शैमाक दावर, अनिल कुंबळे, शंकर महादेवन, मायकल फेल्प्स यांचे मुलांना मार्गदर्शन लाभणार आहे. प्रकल्पात क्लब हाऊस, क्रीडांगण, संगीत कक्ष, आर्ट स्टुडिओ, नृत्य स्टुडिओ, योगकक्ष, गेमिंग रूम, टेनिस कोर्ट, लॅण्डस्केप गार्डन, स्विमींग पूल, क्रिकेट प्रशिक्षण खेळपट्टी, नेट्‌स जिम्नेशियम आदीची सोय उपलब्ध असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाला भरघोस प्रतिसाद लाभत आहे. प्रकल्पातील ५० टक्के फ्लॅटचे आगाऊ बुकींग झाले आहे. येत्या दोन ते अडीच वर्षात संपूर्ण प्रकल्प मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाचे गोव्यात मार्केटीग करण्यात आले आहे. गोंमतकीयांना प्रथम संधी दिली जात आहे, असे गेरा यांनी सांगतिले.

गेरा कंपनीची ही संकल्पना चांगली आहे. एकाच ठिकाणी मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पात राहणार्‍याना नृत्य विषयाचे मार्गदर्शन करणे आवडेल, असे दावर यांनी सांगितले
देशातील बाल व तरूण पिढीतील कौशल्य हेरणे व त्यांच्या विकासाला चालना देऊन खरेखुरे स्टार घडवण्यासाठी गेराची चाईल्ड सेंट्रिक होम संकल्पना एक चांगला पर्याय ठरू शकते, असे महेश भूपती यांनी सांगितले.