गर्भाशय मुखाचा कर्करोग भाग – २

0
280
  •  डॉ. स्वाती अणवेकर

कुक्षीमध्ये अथवा ओटीपोटात वेदना होत असल्यास प्राथमिक गाठ ही कटीविवराच्या भिंतींना लागून आहे असे जाणावे. या सर्वांपेक्षा महत्त्वाचे लक्षण म्हणजे डॉक्टरांना गर्भाशयमुखाजवळ गाठ प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणे होय.

या कर्करोगाचे दोन प्रकार प्रामुख्याने आढळतात.
१) क्वामोस सेल कॅन्सर – हा ८५ ते ९० % रुग्णांमध्ये आढळतो.
२) एडिनोकार्सिनोमा – उर्वरित १० ते १५ % कर्करोग हे या प्रकारचे असतात.
या प्रकारचा कर्करोग हा गर्भाशय मुखाच्या पेशींमध्ये खोलवर असतो. त्यामुळे गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष तपासणी केल्यावर डोळ्यांना त्यातील बदल दिसत नाहीत. त्याचप्रमाणे पॅप स्मिअर टेस्टमध्येदेखील हा कर्करोग सापडत नाही.
अन्य प्रकारचे कर्करोग जसे अटिपिकल एपिथेलियल ट्यूमर, कार्सिनॉइड्‌स, स्मॉल सेल कार्सिनोमा, सार्कोमा, लिम्फोमा हे प्रकारदेखील गर्भाशयमुख कर्करोगात क्वचित आढळतात.

बरेचदा एडिनोकार्सिनोमा आणि क्वामोस सेल कॅन्सर यांचा मिश्र प्रकारचा कर्करोग ज्याला एडिनो स्क्वामोस कार्सिनोमा असे म्हणतात.
लक्षणे ः या कर्करोगात कर्करोग होण्याच्या पूर्व अवस्थेत व कर्करोगाच्या अगदी प्राथमिक अवस्थेत रुग्णामध्ये कोणतीच लक्षणे आढळून येत नाहीत. पण या अवस्थेत पॅप स्मिअर टेस्ट महत्त्वाची ठरते.

पण जेव्हा त्याचे रुपांतर कर्करोगाच्या पुढच्या अवस्थेत जाते तेव्हा मात्र रुग्णाला खालील लक्षणे दिसू लागतात.
१) संभोग करताना वेदना होणे.
२) संभोग दरम्यान व त्यानंतर रक्तस्राव होणे.
३) दोन मासिक पाळींच्या मध्ये रक्तस्राव होणे.
४) योनीमधून दुर्गंधी व पिवळ्या रंगाचा स्राव सतत येणे.
अन्य लक्षणांमध्ये कंबर व त्रिकसंधी म्हणजेच माकडहाड (सॅक्रम) या भागात वेदना होणे, असे झाल्यास हे जाणावे की गाठ ही कटी भागातील मज्जा तंतुंपर्यंत पोचली आहे अथवा कटीमधील लसिका ग्रंथींपर्यंत पोचली आहे. असे झाले असल्यास व्याधीचा प्रसार पुढील टप्प्यात झाला असे जाणावे.
कुक्षीमध्ये अथवा ओटीपोटात वेदना होत असल्यास प्राथमिक गाठ ही कटीविवराच्या भिंतींना लागून आहे असे जाणावे. या सर्वांपेक्षा महत्त्वाचे लक्षण म्हणजे डॉक्टरांना गर्भाशयमुखाजवळ गाठ प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणे होय.
खालील कारणांमुळे स्त्रियांना एचपीव्ही या विषाणूची बाधा होण्याचा धोका संभवतो. या गोष्टी टाळल्यास या विषाणूचे संक्रमण स्त्रियांमध्ये टाळता येऊ शकते.
१) पहिला लैंगिक संबंध हा १५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात येणे.
२) एकापेक्षा अधिक लैंगिक जोडीदार असणे.
३) धूम्रपान करणे.
४) एचआयव्ही या विषाणूची बाधा असणे.
ज्या स्त्रिया या वर नमूद केलेल्या गोष्टींपासून दूर असतात त्यांना गर्भाशयमुखाचा कर्करोग होण्याचा धोका संभवत नाही. तसेच स्त्रियांनी लैगिक संबंध करताना आपल्या जोडीदाराला निरोधचा वापर जरी करायला सांगितला तरी एचपीव्ही या विषाणूपासून संपूर्ण सुरक्षा मिळत नाही. जसे एचआयव्ही या विषाणूमध्ये घडते. कारण एचपीव्ही या विषाणूचा संबंध हा संसर्ग झालेल्या भागाशी आला तरीदेखील त्याचे संक्रमण त्या भागात लगेच पसरते.
क्रमशः