गरज भासल्यास दूध महासंघ ताब्यात घेऊ : मुख्यमंत्र्यांचा इशारा

0
77

राज्यातील दूध पुरवठा सुरळीत करण्यासाठी गरज भासल्यास सध्याचा दूध महासंघ ताब्यात घेऊन उत्तर गोव्यासाठी वेगळा महासंघ स्थापन करण्याची सरकारची तयारी आहे, असे सांगून दूध महासंघ आपल्या व्यवसायात वाढ न करता हितसंबंध जपण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत विष्णू वाघ यांनी आणलेल्या यासंबंधीच्या लक्षवेधी सूचनेवर सांगितले.
डेअरीच्या उत्पादनाची क्षमता १ लाख २५ हजार मीटर आहे. परंतु महासंघाला ते पेलू शकत नाही. त्यांच्या व्यवहाराची चौकशी करण्याची गरजही पर्रीकर यांनी व्यक्त केली. सुरुवातीस सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी नवीन दूध महासंघ स्थापन करण्याचा सरकारचा विचार व्यक्त केेेला होता. प्रतिदिनी गोव्याला साडेचार लाख लिटर दूधाची गरज आहे. दूध महासंघ फक्त ६० हजार लिटर दूधाचे उत्पादन करणे, असे ढवळीकर यांनी सांगितले. या विषयावरील चर्चेत विरोधी नेते प्रतापसिंह राणे, नरेश सावळ आदींनी भाग घेतला.