गणेशोत्सवात वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया

0
131

>>  कोकणसह महाराष्ट्रात गणेशभक्तांत नाराजी

ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवल्याबद्दल कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या तिसर्‍या ङ्गेरीतील उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांची छाननी ही गणेशोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच दि. २७ ऑगस्टला मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया अनंत चतुर्दशीनंतर घेण्यात यावी अशी मागणी राज्यासह कोकणातील विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.
मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेत तिसर्‍या ङ्गेरीतील उमेदवारांना दि. ३१ ऑगस्ट म्हणजेच गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख देण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी दि. २७ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कागदपत्रांची छाननी करतील अशा विद्यार्थ्यांची निवड यादीही दि. २८ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वी दि. २४ ऑगस्टला दुपारी ३ वा. नंतर तिसर्‍या प्रवेश ङ्गेरीतील एम.बी.बी.एस. व बी.डी.एस.साठी प्रवेश घेणार्‍या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर याच दिवशी रात्रौ १० वा.नंतर निवडक उमेदवारांची यादी ऑनलाईन जाहीर केली जाणार आहे व या यादीतील उमेदवारांनी दि. २७ ऑगस्टला आपल्या कागदपत्रांची छाननी मुंबई येथे करायची आहे. देशभरातील सर्व याद्यांमधील उमेदवार यामध्ये असून महाराष्ट्र राज्यातील नीट युजी २०१७ प्रवेश प्रक्रियाचे वेळापत्रक कमीशनर व राज्य सीईटी सेल मुंबईचे अधिकारी चंद्रशेखर व्ही. ओक यांनी ऑनलाईन प्रसिद्ध केले असून ऐन गणेशोत्सवामध्ये या तारखा येत असल्याने अनेक विद्यार्थी, पालकांना गणेशोत्सवापासून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या आनंदास मुकावा लागणार आहे. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया अनंत चतुर्दशीनंतर घेण्यात यावी अशी मागणी विशेषतः कोकण तसेच महाराष्ट्र राज्यातील पालकवर्गातून होत आहे.

हाऊसिंग बोर्ड कॉलनीत
गणेशोत्सव कार्यक्रम
वर्षपद्धतीप्रमाणे हाऊसिंग बोर्ड कॉलनी नवेवाडे वास्को येथे श्री गजश्री विद्यालयाच्या २२ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाला दि. २५ रोजी श्रींच्या पूजनाने सुरूवात होणार आहे. दि. २ सप्टेंबर रोजी मूर्ती विसर्जनाने या उत्सवाची सांगता होईल. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ रोजी सकाळी १० वा. श्री गणेश पूजन, तद्नंतर आरती व तीर्थप्रसाद, संध्याकाळी ७ वा. भजनाचा कार्यक्रम होईल. दि. २६ रोजी संध्याकाळी ५ वा. महिलांसाठी कार्यक्रम व ७ वा. नार्वेकर भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. २७ रोजी संध्याकाळी ४ वा. चित्रकला व रांगोळी स्पधेईचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ रोजी संध्याकाळी ७ वा. समूह नत्य व फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. दि. २९ रोजी संध्याकाळी ७ वा. घुमट आरती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० रोजी संध्याकाळी ७ वा. नृत्य स्पर्धा होईल. दि. ३१ रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद आणि संध्याकाळी ७ वा. शिवसमर्थ भजनी मंडळातर्फे भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वा. ऑर्केस्ट्रा, बक्षीस वितरण व लॉटरी ड्रॉ. दि. २ रोजी संध्याकाळी ५ वा. भजन व तद्नंतर श्रींची विसर्जन मिरवणूक वाडे येथे निघणार आहे. दरम्यान रोज सकाळी ११ वा. व संध्याकाळी ७ वा. पूजा, आरती व तीर्थप्रसाद होणार आहे.

पांडुरंगवाडी बायणा येथील गणेशोत्सवात विविध कार्यक्रम
पांडुरंगवाडी बायणा वास्को येथील विनायक कला संघाचा ३१ वा. सार्वजनिक गणेशोत्सव दि. २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनीय कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. दि. २५ रोजी दुपारी १२ वा. गणेश मूर्तीची विधिवत पूजन, आरती, व तीर्थप्रसाद. दि. २६ रोजी सकाळी ८.३० वा. व सायंकाळी ७ वा. आरती व तीर्थप्रसाद. दि. २७ रोजी सायं. ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘समर्पण ध्यान परिचय शिबिर’. दि. २८ रोजी सायं. ७ वा. बायणा वास्को येथील श्री खाप्रेश्‍वर सांस्कृतिक मंडळातर्फे भजन. दि. २९ रोजी सकाळी ८.३० व सायंकाळी ७ वा. आरती व तीर्थप्रसाद, दि. ३० रोजी सायं. ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ७ वा. बाल कीर्तनकार नेहा अभय उपाध्ये हिचे सुश्राव्य कीर्तन. दि. ३१ रोजी सायंकाळी ६.३० वा. जादुगार वैभवकुमार यांचे जादूचे प्रयोग.
दि. १ सप्टेंबर रोजी सायं. ६.३० वा. गीत गाता चल कार्यक्रम. दि. २ रोजी संध्या. ७ वा. १२ वर्षांखालील व १२ वर्षांवरील अशा दोन गटात नृत्य स्पर्धा. दि. ३ रोजी सायं. ६.३० वा. ५ वर्षांखालील व १२ वर्षांखालील अशा दोन गटात वेशभूषा स्पर्धा. सायं. ७.३० वा. मुरगाव व वास्कोतील दहावी परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार व त्यांच्याहस्ते विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण. दि. ४ रोजी सायं. ६.३० वा. गोल्डन स्टार ऑक्रेट्रा व ८.३० वा. लॉटरी कुपनचा निकाल. दि. ५ रोजी सायं. ४ वा. श्री गणेश मूर्तीचे वाडे वास्को यथील वैभवी महिला दिंडी पथकासमवेत टाळ मृदूंगाच्या गजरात मांगोरहील मार्गे स्वतंत्र्पथ वास्कोमार्गे भव्य मिरवणुकीने बायणा येथे समुद्रकिनार्‍यावर विसर्जन होईल.