खाण महामंडळाचा विचार व्हावा : क्लॉड

0
212

खाण लिजांचा लिलाव करणे हाच एकमेव पर्याय नसून खाण महामंडळही स्थापन करता येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले असल्याने सरकारने त्याबाबतही विचार करावा, असे क्लॉड आल्वारीस यांनी काल सांगितले.
सरकारने खाण महामंडळ स्थापन केले तर त्याचा सर्वांत जास्त फायदा हा खाण अवलंबितांनाच होणार असल्याचे आल्वारीस यांचे म्हणणे आहे. सरकारने खाण महामंडळ स्थापन केले तर खाण अवलंबितांना सहकारी तत्वावर खाणी चालवता येतील आणि तसे झाले तर खाणींवर अवलंबून असलेल्या जनतेचे भाग्यच उजळणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे खाण महामंडळ हा एक अत्यंत चांगला असा पर्याय ठरेल, असे अल्वारीस म्हणाले. केपें-कावरें येथील खाण अवलंबितांनी २०१४ साली सहकारी संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सरकारने नोंदणी करण्यास नकार दिल्याने पुढे काहीही होऊ शकले नाही, असेही आल्वारीस यांनी सांगितले.