खाणी सुरू न झाल्यास जनआंदोलन : आयटक

0
105

राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग गोवा सरकारने विनाविलंब सुरू केला नाही तर आयटक राज्यातील खाण अवलंबितांना घेऊन जनांदोलन सुरू करील, असा इशारा आयटकचे सरचिटणीस व कामगार नेते ऍड्. ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी काल कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
गोवा सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करावा. खाण उद्योग बंद पडल्याने राज्यातील सुमारे ३५ हजार खाण कामगार बेरोजगार झाले आहेत असे सांगूनखाण महामंडळ सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.