खाणींवरील यंत्रसामुग्रीची अखेर आवराआवर सुरू

0
232

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील खाणीचें काम १६ मार्चपासून बंद होणार असल्याने दक्षिण गोव्यातील खाण मालकांनी खाणींवरील मशिनरी हलविण्यास सुरूवात केली आहे. येत्या १६ मार्चपासून खाण परिसरात शुकशुकाट निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत.

खाणीवरील पोकलीन, ट्रक्स, मशिनरी, जीप इतरत्र हलविण्याचे काम सुरू केले असून खाणींचा परिसर मशिनरी मुक्त होण्याची शक्यता आहे. खाणी किती वर्षे बंद असणार हे निश्‍चित नसल्यामुळे मशिनरी खाण परिसरात ठेवणे धोकादायक असल्याने त्या हलविण्यात येत आहे. १५ मार्चनंतर खाणींचे काम बंद झाल्यानंतर काही कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय काही कंपन्यांनी घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सध्या दक्षिण गोव्यात पूर्णपणे व्यस्त असलेले रस्ते येत्या काही दिवसात मोकळा श्‍वास घेतील. काही खाण कंपन्यांनी साठवून ठेवलेला खनिज माल दोन दिवसांत हलविल्यास तो खाण परिसरातच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही खाण कंपन्या सी टिप्परचा वापर करून यंत्रे हलवतात. फोमेंतो कंपनीने असोल्डा शेळवण या ठिकाणी असलेल्या नोवा धातू या बंद पडलेल्या प्रकल्पाच्या आवारात आपली अवजड यंत्रसामुग्री हलविण्यास प्रारंभ केला आहे. तर कोडली येथील सेसा गोवा वेदांता खाण कंपनीने गुड्डेगाळ येथील जागेत मशिनरी आणि मोठे ट्रक आणून ठेवण्यास सुरुवात केली आहे.