खाणबंदी ः फेरविचार याचिकेवर दोन आठवड्यात सुनावणी शक्य

0
134

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात खाण बंदी निवाड्याच्या विरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका पुढील दोन आठवड्यात सुनावणीला येण्याची शक्यता खाण खात्यातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारची याचिका सुनावणीला आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या खाण बंदीच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने १८ महिन्यानंतर पुनर्विचार याचिका गेल्या १९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
खाण बंदीच्या निर्णयामुळे अनेकांसमोर रोजगाराची समस्या निर्माण झाली. खाणीवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या हितरक्षणासाठी याचिका दाखल करण्यात आल्याचा सरकारकडून न्यायालयात दावा केला जाणार आहे.