खाणग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून ३ हजार कोटींच्या निधीसाठी प्रयत्न

0
245

खासदार नरेंद्र सावईकर यांची माहिती
खाणबंदीमुळे अडचणीत आलेल्या खाणग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून तीन हजार कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्न चालविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून तशी मागणी केली असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे असे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.
मडगाव येथील एका कार्यक्रमासाठी आल्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. गोवा सरकारने खाणग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेज दिलेली आहे. ट्रक मालकांसाठीही पॅकेज वाढविली आहे. केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यास खाणग्रस्तांना दिलासा मिळेल. आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेवून मागणी केली असता कायदेशीर बाजू तपासून निर्णय घेणार असे सांगितल्याचे खासदार सावईकर म्हणाले. गोवा ते वालंकिणीपर्यंत रेल्वे येत्या २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर गोवा ते तिरुपतीपर्यंत जाणारी गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला यश मिळेल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मडकई व शिरोडा मतदारसंघांचा समावेश दक्षिण जिल्ह्यात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कारण त्यांना पणजीला जाणे लांब पडते. राशोल-शिरोडा पूल झाल्यानंतर शिरोडा येथील लोकांना मडगावला येणे सुलभ होईल असेही खासदार सावईकर यांनी सांगितले.