खांडेपार पुलासाठी निविदा जारी

0
93

सुमारे १८० कोटी रुपये खर्चाच्या खांडेपार पुलाची निविदा जारी केली असून जुवारी नदीवरील सहापदरी नव्या पुलाचा मार्ग जवळ जवळ निश्‍चित झाला असून दिवाळीनंतर डीपीआर केंद्राला पाठविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सांगितले. ढवळीकर यांनी या विषयावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जुवारी पुलाचे सर्व सोपस्कार लवकर पूर्ण करणार असल्याचेही ते म्हणाले. जुने गोवे ते पणजी दरम्यानच्या कदंब रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे काम जोरात सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.