खरपाल येथे अपघातात दोडामार्गचे तीन जखमी

0
57

दोडामार्ग (न. प्र.)
गोवा दोडामार्ग खरपाल गोवा हद्दीत शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास स्कूटरवरून कामावर जात असताना कालव्यावरून मोटारसायकल घेऊन आलेल्या दोघा युवकांनी स्कूटरला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोडामार्गमधील तीन जण जखमी झाले.
जखमींवर गोवा येथे उपचार सुरू आहेत. दोडामार्ग येथील आनंद हेरेकर हे आपली स्कूटर घेऊन दोडामार्ग पणजी मुख्य रस्त्याने गोव्यात जात होते. तर दोडामार्ग थेथिल विनायक ताटे व शाहू ताटे हे दोघे मोटारसायकलने तिलारीच्या गोवा खरपाल कालव्यावरून येत असताना हा अपघात झाला.