खनिज वाहतुकीच्या दराबाबत मुख्यमंत्र्यांचे ट्रकमालकांना आश्‍वासन

0
89

ई-लिलावात गेलेल्या खनिजाची वाहतूक करण्याबाबतचे दर निर्धारित करण्याच्या मागणीसाठी काल ट्रकमालकांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मागण्या सादर केल्या. त्यावर दर निश्‍चित करण्याबाबतचा विषय शुक्रवारी होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी ट्रकमालकांना दिले.