खनिज उत्खननात घट

0
80

राज्यातील खनिज उत्खननात चालू हंगामात तीन महिन्यांत घट नोंद झाली आहे. राज्यात डिसेंबर २०१७ पर्यत ६.८ दक्षलक्ष टन खनिजाचे उत्खनन करण्यात आले आहे, अशी माहिती खाण खात्याच्या सूत्रांनी दिली.

गतवर्षी डिसेंबर २०१६ अखेर ७.५ दक्षलक्ष टन खनिजाचे उत्खनन करण्यात आले होते. राज्यातील खाण घोटाळा उघडकीस आल्यानंतर खनिज उत्खननावर बंदी घालण्यात आली होती. दोन वर्षापूर्वी खनिज उत्खननावरील बंदी मागे घेतल्यानंतर खनिज उद्योगाला पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे.

खनिज बंदी हटविल्यानंतर खनिज उद्योगाला गती मिळालेली नाही. राज्याला २० दक्षलक्ष टन खनिज उत्खनन करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचा दर घसरल्याने खाण उद्योगाला गती मिळालेली नाही. गतवर्षी २०१६-१७ मध्ये निर्धारीत केलेले खनिजाचे सुध्दा उत्खनन झालेले नाही. चालू वर्षीच्या हंगामातील तीन महिन्यात केवळ ६.८ दशलक्ष टन खनिजाचे उत्खनन करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोनशीतील खाणी बंद करण्यात आल्याने खनिज उत्खननावर परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

खनिजाला चांगला दर मिळत नसल्याने अनेक खाण उद्योजक खनिज उत्खनन करण्यास पुढे येत नाहीत. राज्यातील खनिज उत्खनन मर्यादा वार्षिक ३५ दशलक्ष टन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तर दुसर्‍या बाजूने निर्धारित केलेले २० दशलक्ष टन खनिजाचे उत्खनन सुध्दा केले जात नाही.