कोविड इस्पितळातील बहुतेक डॉक्टर, नर्सना बाधा : कामत

0
147

राज्यात कोविड स्थिती गंभीर बनली असून मडगाव येथील कोविड इस्पितळात सेवा देणार्‍या डॉक्टर व नर्सेसना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ लागला असल्याचे काल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या परिस्थितीमुळे कोविड योद्धे असलेल्या डॉक्टर व नर्सेस तणावाखाली असल्याचे ते म्हणाले. चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल मिळण्यास आता फारच उशीर होऊ लागलेला असून ती सर्वांत मोठी डोकेदुखी ठरू लागली असल्याचे त्यांनी सांगितले.

हॉस्पिसियो इस्पितळात चाचण्या करणे बंद करण्यात आल्याने समस्येत आणखी भर पडली असल्याचे कामत म्हणाले. नमुन्यांची एक-दोन दिवसांत तपासणी करण्यात आल्यानंतर या चाचण्यांचे अहवाल चुकीचे येणार नाहीत कशावरून असा प्रश्‍नही त्यांनी केला.