‘कोळसा’ रद्दचा गोव्यावर परिणाम नाही : पर्रीकर

0
72

गोव्याचा छत्तीसगड येथील कोळसा साठा रद्द झाल्याने आपल्या सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. गरज भासल्यास कोळसा आयात करण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे पडून आहेत. सरकारला या प्रकरणांचा निकाल लागलेला हवा. कोळसासाठ्याच्या बाबतीत निकाल लागला. केंद्र सरकार पुढील महिनाभरात या विषयावर योग्य तो निर्णय घेईल. त्यामुळे आपल्याला मुळीच चिंता नाही, असे पर्रीकर यांनी सांगितले. छत्तीसगड येथील गोव्याच्या कोळसासाठ्यापासून राज्याला सुमारे ४०० मेगावॅट विजेचा पुरवठा होणार होता, हे त्यांच्या निदर्शनास आणले असता त्यावर पर्यायी व्यवस्था करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.