कोळसा प्रकल्पाशी संबंधित कामे त्वरित बंद करा : कॉंग्रेस

0
120

गोव्याला कोळसा वाहतुकीचे प्रमुख केंद्र बनविण्यास कॉँग्रेस पक्षाचा सक्त विरोध आहे. कोळसा वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची कामे त्वरित बंद करावीत, अशी मागणी कॉँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी कॉँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात कोळसा वाहतुकीला विरोध होत असल्यास हा प्रकल्प अन्यत्र हलविण्याबाबत केलेल्या घोषणेवर विश्‍वास ठेवला जाऊ शकत नाही, असे आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले. कॉँग्रेस पक्ष वास्कोला ‘कोल हब’ बनविण्यास सक्त विरोध करणार आहे. स्थानिक नागरिकांकडून कोळसा वाहतूक, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, नद्यांचे ड्रेजिंगला विरोध केला जात आहे. ग्रामसभांच्या माध्यमातून नागरिकांकडून प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठविला जात आहे. लोकांच्या विरोधाला न जुमानता प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी भाजप आघाडी सरकार प्रयत्न करीत आहेत, असा आरोप रेजिनाल्ड यांनी केला.
वास्को कोळसा प्रदुषणामुळे स्थानिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, असेही आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले.