कोलकाता नाईट रायडर्सची राजस्थान रॉयल्सवर मात

0
74

कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार दिनेश कार्तिक व ख्रिस लिन यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर ६ गड्यांनी मात करीत आयपीएलच्या चौथ्या पर्वात गुणतक्त्यात तिसर्‍या स्थानावर पोहोचत १४ गुणांसह आपले बाद फेरीतील प्रवेशाचे आव्हान जिवंत राखले. पराभर राजस्थान रॉयल्स १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. या दोन्ही संघांचे अजून प्रत्येकी १ सामना बाकी आहे. कोलकाताला आता बाद फेरीतील प्रवेशासाठी शनिवारी सनराझर्स हैदराबादविरुद्ध होणार्‍या लढतीत विजय अत्यावश्यक आहे.

राजस्थान रॉयल्स संघाला १४२ धावांवर रोखल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने विजयी लक्ष्य ४ गड्यांच्या मोबदल्यात १८ षट्‌कांत १४५ धावा करीत गाठले. ख्र्रिस लिनने ५ चौकार व १ षट्‌कारांसह ४५ तर दिनेश कार्तिकने ५ चौकार व १ षट्‌कारासह ३१ चेंडूत ४१ धावांचे योगदान देत विजयात मोलाचा वाटा उचलला. सुनिल नारायण व नितीश राणा यांनी प्रत्येकी २१ धावा जोडल्या. राजस्थानतर्फे बेन स्टोकने ३ तर ईश सोधीने १ बळी मिळविला.

तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व कुलदीप यादवसह अन्य गोलंदाजांनी सूत्रबद्ध मारा करीत राजस्थान रॉयल्सचा डाव १९ षट्‌कांत १४२ धावांवर संपुष्टात आणला. राजस्थानच्या जॉस बटलर ३९, राहुल त्रिपाठी २७ आणि तळाचा फलंदाज जयदेव उनाडकट यांनाच काहीसा प्रतिकार करता आला. त्रिपाठी आणि बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. परंतु हे दोघे तंबुत परतल्यानंतर इतर फलंदाज ठराविक अंतराने स्वस्ताब बाद होत गेल्याने त्यांचा डाव १४२ धावांवर संपुष्टात आला. कोलकातातर्फे कुलदीप यादव सर्वांत यशस्वी गोलंदाजी ठरला. त्याने २० धावांत ४ बळी मिळविले. आंद्रे रसेल व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी २ तर शिवम मावी व सुनिल नारायण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

धावफलक
राजस्थान रॉयल्स ः राहुल त्रिपाठी झे. दिनेश कार्तिक गो. आंद्रे रसेल २७, जॉस बटलर झे. जॅवोन सीअर्ल्स गो. कुलदीप यादव ३९, अजिंक्य रहाणे त्रिफळाचित गो. कुलदीप यादव ११, संजू सॅमसन पायचित गो. सुनिल नारायण १२, बेन स्टोक्स झे. व गो. कुलदीप यादव ११, स्टुअर्ट बिन्नी यष्टिचित दिनेश कार्तिक गो. कुलदीप यादव १, कृष्णप्पा गौतम झे. दिनेश कार्तिक गो. शिवम मावी ३, जयदेव उनाडकट त्रिफळाचित गो. प्रसिद्ध कृष्णा २६, ईस सोधी झे. दिनेश कार्तिक गो. प्रसिद्ध कृष्णा १, जोफ्रा आर्चर झे. शुभम गिल गो. आंद्रे रसेल ६, अनुरित सिंग नाबाद ३. अवांतर ः २. एकूण १९ षट्‌कांत सर्वबाद १४२ धावा.

गोलंदाजी ः शिवम मावी ४/०/४४/१, प्रसिद्ध कृष्णा ४/०/३५/२, सुनील नारायण ४/०/२९/१, आंद्रे रसेल ३/०/१३/२, कुलदीप यादव ४/०/२०/४.
कोलकाता नाईट रायडर्स ः सुनील नारायण झे. कृष्णप्पा गौतम गो. बेन स्टोक्स २१, ख्रिस लीन झे. अनुरीत सिंग गो. बेन स्टोक्स ४५, रॉबिन उथप्पा झे. राहुल त्रिपाठी गो. बेन स्टोक्स ४, नितीश राणा पायचित ईश सोधी २१, दिनेश कार्तिक नाबाद ४१, आंद्रे रसेल नाबाद ११. अवांतर ः २. एकूण १८ षट्‌कांत ४ बाद १४५. गोलंदाजी ः कृष्णप्पा गौतम २/०/३२/०, बेन स्टोक्स ४/१/१५/३, जोफ्रा आर्चर ४/०/४३/०, ईश सोधी ४/०/२१/१, जयदेव उनाडकट ३/०/२३/०, अनुरीत सिंह १/०/१०/०.