कोण आहेत योगीराज?

0
190

योगीराज गुरुनाथ सिद्धनाथ हे साधे परंतु तरीही असामान्य व्यक्ती आहे. त्यांचा जन्म उत्तर ग्वाल्हेरमध्ये १० मे १९४४ रोजी झाला असून ते सूर्यवंशीय रामाच्या ईश्‍वाकू घराण्याचे वंशज आहेत. त्यांच्या या कुळपरंपरेशिवाय त्यांनी वयाच्या तिसर्‍या वर्षीच योग्यता आणि परमानंद मिळवला आणि स्वतःचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते योगी बनले.
त्यांनी त्यांच्या वयाची सुरुवातीची वर्षे हिमालयात नाग योग्यांसोबत राहून घालवली, तसेच हिमालयातील गुहेत राहणार्‍या महायोग्यांकडून योगीराजांना आशीर्वाद आणि शक्ती मिळाल्या. श्रेष्ठ आणि महान योगी ज्यांना महावतार शिव-गोरक्ष बाबाजी म्हणतात, त्यांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर त्यांच्यातील दैवी शक्ती आणखीनच विकसित झाली.
आज, कुंडलिनी क्रिया योगाचे गुरू म्हणून योगीराज गुरुनाथ यांनी अविरत कार्य करून, आपल्या सर्वांच्या आत्म्यांमध्ये स्फुलिंग चेतवण्याचे काम केले आहे. तसेच आपल्यामध्ये ‘‘स्वतःच्या शांतीद्वारे जगाची शांती’’ मिळवण्याचे बीजारोपण केले. योगीराज आणि त्यांची पत्नी- गुरुमाता शिवांगिनी ज्यांना भक्तगण ‘आई’ म्हणतात, दोघांनी पुण्याच्या बाहेर सिंहगड परिसरात एक सिद्धनाथ वन आश्रम बांधला आहे. गुरुमाता शिवांगिनी ही एक शक्तिशाली योगिनी असून दोघांना दोन मुले असून ते आदर्श आजीआजोबा आहेत आणि स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी लोकांसमोर असा आदर्श निर्माण केला आहे की – प्रत्येकाला संन्यासासारखे जीवन जगण्याची आवश्यकता नाही तर आपल्यामध्ये ज्ञानाचा उदय हा ध्यानाद्वारेही होऊ शकतो – परंतु त्यासाठी प्रत्यक्ष सांसारिक जीवनाचा अनुभव घेणे जास्त महत्त्वाचे आहे.
जवळजवळ ४० वर्षांपासून, योगीराजांनी जगातील लाखो लोकांना कुंडलिनी शक्ती जागृतीद्वारा बरे केले आहे, तसेच त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणले आहे आणि त्यांना स्वतःला शांती आणि परमानंद प्राप्ती कशी झाली याबद्दल लोकांना मोकळेपणाने सांगितले आहे. योगीराज यांनी केवळ आपल्या भक्तांनाच आध्यात्मिकता आणि योग शिकवलेला नसून जागतिक नेत्यांनाही शिकवला आहे व युनायटेड नेशन्समध्येही प्रायोगिक उपदेश दिलेला आहे. तरीसुद्धा आजही त्यांना प्राचीन जंगलात किंवा पर्वतावर बसून देवाचे शांतीपूर्ण ध्यान करणे जास्त प्रिय आहे.
योगीराज गुरुनाथ हे ईश्‍वर नाहीत तर ते सकारात्मकतेचे दीपस्तंभ आहेत, जे मानवजातीला आत्मशांती मिळविण्याचे साहस प्रदान करत आहेत आणि सर्वांचे एकत्रीकरण करून पृथ्वी शांत करण्यास प्रोत्साहन देत आहेत.