कॉंग्रेस विधीमंडळ बैठकीत म्हादई प्रश्‍नावर चर्चा

0
110

कॉँग्रेस विधीमंडळ गटाच्या कालच्या बैठकीत म्हादई नदीतील पाणी पिण्यासाठी कर्नाटकाला देण्याच्या प्रश्‍नावर द्विपक्षीय चर्चा करण्यास आक्षेप घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हादई नदीतील पाणी पिण्यासाठी देण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करण्याची तयार असल्याचे पत्र कर्नाटकातील भाजपचे नेते येडियुरप्पा यांना दिल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

मंगळवारी पर्वरी येथे घेण्यात आलेल्या कॉँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत म्हादई प्रश्‍नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. म्हादई नदीतील पाणी वाटपाचा प्रश्‍न जललवादासमोर आहे. तरीही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकातील भाजपचे येडियुरप्पा यांना पाणी प्रश्‍नावर द्विपक्षीय बोलणी करण्यास तयार असल्याचे पत्र दिल्याने राज्याच्या हिताला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.