कॉंग्रेसला पर्रीकर सरकारच्या ‘गुप्त कार्यक्रमाबाबत’ संशय

0
89

गोव्यातील शांतता बिघडवू पहाणार्‍या श्रीरामसेनेसारख्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सरकार पाठिशी घालण्याचा का प्रयत्न करीत आहे, असा प्रश्‍न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी काल केला. पर्रीकर सरकारने आपल्या पक्षाचा ‘गुप्त कार्यक्रम’ राबविण्याचा प्रयत्न चालविण्याचा संशय येत आहे. श्रीराम सेनेच्या विरोधाची पर्वा न करता सासष्टीतील लोकांनी तौसिफ यांच्या ‘आकांतवादी गोयांत नाका’ या तियात्राचा यशस्वी प्रयोग करून गोमंतकीय जनतेने चांगला संदेश दिल्याचे प्रदेश फर्नांडिस यांनी म्हटले आहे.