कॉंग्रेसने सरकार स्थापनेची स्वप्ने पाहू नयेत ः भाजप

0
78

कॉंग्रेस पक्षाने राज्यात सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पाहू नयेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना मारला. भाजपने येथील आझाद मैदानावर आयोजित धरणे कार्यक्रमाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर बोलत होते.

कॉंग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली होती. परंतु, या संधीचा फायदा उठवू शकले नाहीत. कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या १६ वरून १५ वर आलेली आहे. देशपातळीवर राजकीय स्थिती पाहता कॉंग्रेस पक्षाला पराभवाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात सुध्दा सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पाहू नयेत, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

सरकारने कामकाज योग्य पद्धतीने
मुख्यमंत्र्याच्या अनुपस्थितीत तीन सदस्यीय मंत्रिमंडळ सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली भाजप आघाडी सरकारचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू आहे. मुख्यमंत्री पर्रीकर उपचारानंतर महिन्यानंतर परत येऊन सरकार पातळीवरील कामकाजाला आणखी गती देतील.

लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात खंड पडल्याने राज्यातील खाण बंदी व इतर प्रश्‍न उपस्थित करणे शक्य झाले नाही. कामकाज बंद पाडण्याची कृती निषेधार्ह आहे. भाजपच्या सर्व खासदारांनी कामकाज बंदच्या काळात भत्ता व पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पगार व भत्त्याचे ३ कोटी ५० लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याची विनंती करण्यात आली आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.