कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर येईल

0
91

>> लुईझिन फालेरो यांचा दावा 

गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला किमान २३ जागा मिळून राज्यात कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्‍वास काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
यंदा सत्तेवर आले की आम्ही गोव्यातील जनतेला सुशासन देणार असून भ्रष्टाचाराला अजिबात थारा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. एखादा मंत्री व आमदार भ्रष्टाचार करीत असल्याचे आढळून आल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येईल याविषयी जराही शंका नसल्याचे सांगून जास्तीत जास्त २५ जागाही कॉंग्रेसला मिळू शकतात असेही ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाने यावेळी अत्यंत चांगला असा जाहीरनामा तयार केला होता. त्यात युवकांसह सर्व घटकांसाठी बरेच काही होते असे सांगून सरकार सत्तेवर आल्यानंतर जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सत्तेवर आल्यास गोव्याच्या आणि गोमंतकीयांच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याचे ङ्गालेरो म्हणाले.
आज आत्मपरीक्षण
आज मंगळवार दि. ७ रोजी पक्षाच्या सर्व उमेदवारांना बोलावले असून आत्मपरीक्षण करण्यात येणार असल्याचे ङ्गालेरो यांनी सांगितले. नावेली मतदारसंघात विरोधकांनी पैशांचा पाऊस पाडला. आपला पराभव करण्यासाठी सर्व ते काही केले. पण तरीही आपला विजय निश्‍चित असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री आमदाराच ठरवतील
तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठीच्या शर्यतीत आहात काय, असे पत्रकारांनी विचारले असता निवडून येणारे आमदारच आमचा मुख्यमंत्री कोण ते ठरवणार असल्याचे ते म्हणाले. यंदा कॉंग्रेसने नव्या व युवा चेहर्‍यांना उमेदवारी दिली होती. त्याचाही ङ्गायदा पक्षाला होणार असल्याचे ङ्गालेरो म्हणाले.