केवळ २५ टक्के शेतीचे नुकसान : खात्याचा दावा

0
85

राज्यातील ७५ टक्के शेतकर्‍यांनी भात कापणी व मळणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर यंत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना सध्या पडत असलेल्या संततधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनीही त्यास दुजोरा दिला. कापणी न केलेल्या भाताला कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या कापणी न केलेल्या शेतकर्‍यांची धावपळ सुरू झाली आहे.यंदा मुबलक प्रमाणात कापणी यंत्रे उपलब्ध होती. एकूण ९२ यंत्रे खात्याने उपलब्ध करून दिली होती. वरील २५ टक्क्यां पैकी काही शेतकर्‍यांचे भात परिपक्व झाले नव्हते. त्यामुळेही कापणीस विलंब झाला होता, असे संचालक रॉड्रिगीस यांचे म्हणणे आहे.सध्या पडत असलेला पाऊस हा नारळ, सुपारी व काजू उत्पादनास अत्यंत चांगला असल्याचे कृषी संचालक आर्नाल्ड रॉड्रिगीस यांनी सांगितले.