केरी-सत्तरीत पकडला आठ फुटी किंगकोब्रा

0
110
विराज नाईक याने केरी-सत्तरी येथे पकडलेला किंगकोब्रा.

मोर्ले (न. वा.)
केरी-सत्तरी येथील आजोबा देवस्थान जवळील रस्त्याच्या बाजूला विराज उर्फ वीरू नाईक यांनी ८ फुटी किंगकोब्रा पकडला.
दुपारच्या वेळी शाळा सुटल्यावर शाळेचे विद्यार्थी घरी जात असताना व टेमवाडा येथील नागरिक बाबली गावस आपल्या घरी जाताना त्यांना तो दिसल्यावर त्यांनी लगेच सर्पमित्र विराज नाईक याला संपर्क केला. विराज नाईक त्या ठिकाणी येऊन किंगकोब्रा पहिला व त्यांनी केरी रेंज फॉरेस्ट ऑफिसर गिरीश बैलुडकर याना संपर्क केला.त्यानंतर वनखात्याचे कर्मचारी तिथे पोचल्यावर विराजने किंगकोब्रा पकडून वनखात्याच्या स्वाधीन करण्यात आला. दोन दिवसांअगोदर विराजने केरी येथे साडेतीन मीटर लांब अजगर पकडला होता.