केरळात बारचे परवाने रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई

0
92

केरळात बारचे परवाने तूर्त रद्द करू नयेत असा मनाई आदेश सर्वोच्च न्यायालयाने जारी केला. दरम्यान, यासंबंधी केरळ बार असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर गुरूवारी (आज) सुनावणी घेणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
येत्या दहा वर्षांत केरळ राज्याला दारुमुक्त राज्य बनविण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाला अनुसरून उद्या शुक्रवारपर्यंत ७०० बारचे परवाने रद्द होणार होते. त्यांना आता दिलासा मिळेल.
राज्यात केवळ पंचतारांकित हॉटेलांमध्ये, ते सुद्धा रविवार वगळून दारू उपलब्ध करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. केवळ पंचतारांकित हॉटेलना वगळळ्यामागील तर्क काय, असा प्रश्‍न करून सर्वोच्च न्यायालयाने धोरणावर सुनावणी घेण्यास मान्यता दर्शवली.
बारवाल्यांचे असेही म्हणणे आहे की, दारुबंदी आली तर केरळमध्ये येणारे पर्यटक गोवा किंवा श्रीलंका यासारख्या अन्य स्थळांकडे वळतील.