केरळमध्ये विमान दुर्घटनेत वैमानिकासह १६ जण ठार

0
159

केरळमधील कोळ्ळीकोड विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरल्यामुळे वैमानिकासह १६ प्रवाशांचा मृत्यू झाला. हे विमान दुबईतून केरळच्या कोझिकोड विमानतळावर हे उतरले. या विमानात १९१ प्रवासी होते. विमानाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक संचलनालयाने या विमानात १९१ प्रवासी होते असे स्पष्ट केले आहे. अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. विमान धावपट्टीवरुन घसरताच एकच हलकल्लोळ उडाला आणि लगेच हा अपघात घडला. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. काल भूस्खलन झाले व मागोमाग ही विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना वाचवण्यासाठी आता मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.