केटीएमचा गोव्यात दिमाखदार स्टंट शो

0
95

पणजी
युरोपातील एक प्रमुख रेसिंग लेजंड असलेल्या केटीएमद्वारे गोव्यामध्ये थरारक केटीएम स्टंट शो सादर करण्यात आला. व्यावसायिक स्टंट रायडरचे कौशल्य आणि थरारक स्टंट राइडचा गोमंतकीयांना अनुभव देण्याच्या उद्देशाने या स्टंट शोचे आयोजन करण्यात आले होते.
पणजीतील मिरामार रोडवरील युथ होस्टेलच्या बास्केटबॉल कोर्टवर हा स्टंट शो पार पडला. यावेळी व्यावसायिक स्टंट टीमद्वारे श्वास रोखायला लावणारे काही स्टंट केटीएम ड्युक बाइकवर सादर केले.याबाबत बजाज ऑटो लि.चे अध्यक्ष- प्रोबायकिंग अमित नंदी म्हणाले, उच्चम कामगिरी करणार्‍या रेसिंग बाइकसाठी केटीएम ब्रँड जगप्रसिद्ध आहे. केटीएम बाइकच्या माध्यमातून साहस आणि थरारक राइडा अनुभव बाइकप्रेमींना मिळावा अशी आमची अपेक्षा राहिली आहे. अशा प्रकारचे व्यावसायिक स्टंट शो देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले जातात आणि भविष्यात अशा उपक्रमांची संख्याही वाढणार आहे. केटीएम हा एक एक्स्लुझिव्ह प्रिमिअम ब्रँड असून केटीएम ब्रँडची ओळख ठरलेला अनुभव आमच्या केटीएम ग्राहकांना देण्याचा आमचा काटेकोर प्रयत्न राहिला आहे. हा उपक्रम सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला होता आणि हा दिमाखदार थरारक स्टंट शो पणजीतील एक प्रमुख आकर्षणकेंद्र राहिला. आजवर सूरत, राजकोट, अहमदाबाग, कांचिपूरम, कोईमतूर, चेन्नई, विजयपूर, लखनौ, इंदूर, जबलपूर, औरंगाबाद, जम्मू, जालंदर, जोधपूर, गुडगाव, कोल्हापूर, पणजी अशा अनेक शहरांत केटीएम स्टंट शोचे आयोजन केले गेले आहे. केटीएमप्रेमींसाठी केटीएम बाइकची वैविध्यपूर्ण श्रेणी खरेदीसाठी केटीएम पर्वरीमध्ये उपलब्ध आहे. या शोरूमचा पत्ता वझे हाइट्स, एनएच-१७, पीएमसी बँकेसमोर, एसबीआय कॉलनी, पर्वरी, गोवा.